बेमसील(बेलगाम मॅन्युफॅकचरर को ऑपरेटीव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड)या संस्थेच्या 2019 ते 2024 पाच वर्षांच्या काळासाठी झालेल्या निवडणुकीत जुन्या पॅनलच्या अधिक जागा निवडून आल्या आहेत.
जुन्या पैकी उद्योजक शशी चंदगडकर,प्रमोद हेगडे,सुभाष हंजी,ए टी पत्रावळी हे तर राम भंडारे सचिन सबनीस आणि मारुती कोणू हे नवीन पॅनल मधील सदस्य विजयी झाले आहेत. अगोदरच भावना देशपांडे आणि अनिता पाटील या महिला गटातून बिन विरोध झाल्या आहेत.
बेमसील ही बेळगाव उद्यमबाग औद्योगिक भागातील 70 वर्षे जुनी संस्था असून औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी कारखानदारांना जमीन उपलब्ध करून देते या संस्थेने आता पर्यंत यशस्वी रित्याअनगोळ उद्यमबाग आणि मच्छे येथे इंडस्ट्रीयल इस्टेटचा विकास केला आहे.तर नावगे भागात सुपीक जमिनी संपादन करत नवीन औद्योगिक वसाहत निर्माण केली होती.भविष्यात शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमीन न बळकावता नापीक बंजारा जमिनीत औद्योगिक विकास साधण्याचे आव्हान या नवनिर्वाचित सदस्यां समोर आहे.