एकेकाळी रॅम्पवॉक हा शब्द बेळगाव सारख्या टायर थ्रीच्या शहराना नवीन होता मात्र आजच्या घडीला अनेक जण रॅम्पवॉक किंवा सौन्दर्य स्पर्धा मधून यश मिळवत आहेत.पुणे येथे झालेल्या स्पर्धेत बेळगावच्या स्नेहा नागनगौडा हिने मिस महाराष्ट्र रॅम्पवॉक आणि मिस बेस्ट स्माईल 2019 हा किताब मिळवला आहे. रॅम्पवॉक किंवा स्माईल सारख्या फॅशन शो मध्ये केवळ मोठी शहराचं नाही तर लहान लहान खेड्यातील युवती यश मिळवता आहेत हे सिद्ध झाले आहे.
पुणे येथे झालेल्या ( महाराष्ट्रास नेक्स्ट सुपर मोडेल 2019 ) या फॅशन शोमध्ये बेळगाव तालुक्यातील खनगाव गावची कन्या स्नेहा नागनगौडा ही सहभागी झाली होती.या स्पर्धेतील टायटल टू ची मानकरीन ठरली आहे तिची स्माईल अख्या महाराष्ट्रात अव्वल ठरली आहे तिचा रॅम्पवॉक देखील उत्कृष्ट ठरला आहे.
खनगाव सारख्या छोट्याशा खेड्यात राहून देखील आधुनिक पद्धतीच्या रॅम्पवॉक आणि स्माईल स्पर्धेत राज्यात अव्वल ठरत यश संपादन केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्नेहा केवळ मॉडलिंग करत नसून एक उत्कृष्ट लावणी डान्सर सुद्धा आहे.यासाठी तिला तिच्या कुटुंबियांची साथ मिळत आहे.सौन्दर्य क्षेत्रात बेळगाव शहराचं नाव उज्वल करू असा मानस तिने व्यक्त केलाय.