वर्दीच्या रिक्षात आठ विद्यार्थ्यांची ने आन सक्तीची केल्यावर जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी रिक्षांना मीटर सक्ती करणार आहेत.आगामी 15 आगष्ट पासून ही मीटर सक्ती करणार लागू होणार असून एक आठवड्याच्या आत मीटरचे दर अंतिम केले जाणार आहेत.
परिवाहन खात्यासोबत झालेल्या बैठकीत 15 आगष्ट पासून मीटर सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.लवकरात लवकर ऑटोचालक आणि ऑटो मालका सोबत बैठक घेऊन दर अंतिम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.मंगळवारी सकाळी त्यांनी परिवाहन खात्यासोबत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले होते.परिवाहन खाते पोलीस आयुक्त अधिकारी यांच्या नेतृत्वात ऑटो चालकांची बैठक घ्या सविस्तर चर्चा करून दर निश्चित करा असे देखील ते म्हणाले.
ऑटो मीटर सक्तीचे आदेश देत असताना त्यांनी रेल्वे बस स्थानक आणि सेंट्रल बस स्थानकात प्रीपेड ऑटो रिक्षा चालू करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.त्यावर या विषयी पूर्ण तयारी करू असे आश्वासन परिवाहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले.ऑटो मीटर सक्तीवर लक्ष देऊन अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर भर द्या अश्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या.नियमापेक्षा अधिक मुले वाहणाऱ्या वर्दीच्या 126 रिक्षावर कारवाई करत त्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आले आहेत.
शहरात 6000 ऑटो रिक्षा असून 4000 रिक्षांना मीटर जोडण्यात आले आहेत.परिवाहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी बैठकीत दिली बस स्थानका पासून 500 मीटर अंतरावर असलेल्या खाजगी टेम्पोची प्रवाशी वाहतूक बंद करा अश्या सूचना पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी दिल्या.शहरात ऑटोची संख्या वाढल्याने पुढे ऑटोना परवाने देऊ नये अशी मागणी ऑटो चालकांनी केली.
अनेकदा ऑटो मीटर सक्तीच्या बैठका झाल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले मात्र अध्याप रिक्षांना मीटर सक्तीची अंमलबजावणी कधीच झाली नाही आता बोमनहळळी यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार का?किंवा ही बैठक नाम मात्र होती हे पुढील काळच ठरवणार आहे.