कारगिल युद्धात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सैनिकांच्या कुटुंबांना किती शोक झाला असेल? आज आम्ही सर्वजण देशात विजयोत्सव करीत असताना त्या कुटुंबांना शोक आवरत नसेल. असे उद्गार बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी काढले.
कारगिल विजय दिवसाच्या विसाव्या वर्धापन निमित्त कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरणा दिली. भारतीय लष्करी दलातर्फे आयोजित प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय लष्करात सहभागी होऊन देशसेवा करा असे त्यांनी सांगितले. कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेऊन वैद्यकिय सेवा दिलेले निवृत्त सुभेदार सी आर बेळगावकर यांनी आपले अनुभव सांगितले.
कारगिल युद्धातील हिरो निवृत्त सुभेदार तुकाराम पाटील व बेळगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
सीईओ बर्चस्वा यांनी स्वागत करून आभार मानले.बोर्ड सदस्य साजिद शेख, आलेदीन किल्लेदार, विक्रम पुरोहित, निरंजना अष्टेकर व इतर उपस्थित होते.