महाराष्ट्र एकीकरण समितीच शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
शहर समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजी माजी नगरसेवक, खानापूर समितीचे दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर समितीचे शिष्टमंडळ तसेच बेळगाव तालुक्यातील काही नेते सोमवारी सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत.
सकाळी अकरा वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तर सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत बेळगाव सह सीमा भाग केंद्र शासित मागणी करून मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे न्यावे बेळगावचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी देखील मागणी केली जाणार आहे.