काकती येथील एक लहान मूल धोकादायक वीज खांबामुळे दगावले. पावसाच्या दिवसात घडलेली ही घटना सावध करणारी आहे. हेस्कोम चे अधिकारी शहाणे होणार नाहीत आता आपला जीव वाचवण्यासाठी आपणच सावध होणे योग्य ठरेल.
सिद्धार्थ हा मित्रां सोबत देसाई गल्लीत क्रिकेट खेळत होता त्यावेळी चेंडू आणायला गेला असता खांबाला विद्युत भारित तार गुंडाळून ठेवली होती त्याचा स्पर्श तारेला स्पर्श होऊन शॉक लागून त्याचे निधन झाले होते. ऐन पावसाळ्यात कोणत्याही विद्युत प्रसरण पावणाऱ्या वस्तूला हात लावताना,शेतात किंवा कुठेही काम करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
बेळगाव शहर आणि परिसरातील धोकादायक वीज खांबांची संख्या वाढत आहे. हे खांब आणि जिवंत विजेच्या तारा हेस्कोम च्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे पण नागरिकांनी सावधगिरी न बाळगल्यास जीवाला मुकावे लागणार आहे.
याची योग्यवेळी दक्षता घेणे गरजेचे आहे.