पाऊस आला आणि आंधळ्या प्रशासनाचा कारभार समोर आला. ग्रामीण भागातील रस्त्यावर चालणेदेखील मुश्किल बनले आहे. पावसाळ्यात रस्ते खड्डेमय पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणूक लढविताना रस्ते पाणी गटारी सार्या सुविधा पूर्व असे आश्वासन देणारे आता मात्र या रस्त्याकडे पाठ फिरवून मुग गिळून गप्प आहेत. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून ते बुजविण्या कडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे तरी रस्त्यांची डागडुजी करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहेनिलजी गोकुळ नगर रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून चालणे फिरणे मुश्किल झाले आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावाने जोडणारे संपर्क रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची वाताहत झाली असून संबंधित सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रतिनिधींनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर पूर्णता चिखलाचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडत आहेत. मात्र संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे मोठी दुर्घटना घडू नये असे वर्तविण्यात येत आहे.