उरलेल्या 32 गाळे टेंडर न काढता परस्पर भाड्याने दिल्याचा आरोप करत माजी ए पी एम सी सदस्य अर्जदार व्यापाऱ्यांनी ए पी एम सी समोर निदर्शन केली.शनिवारी दुपारी ए पी एम मार्केट यार्डा समोर निदर्शन करत अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांनी यात भ्रष्टाचार करत पैसे खाल्याचा आरोप केला आहे.
ए पी एम सी भाजी मार्केट मधील उरलेले 32 गाळे टेंडर नसताना बेकायदेशीर रित्या भाड्याने दिलेले आहेत प्रति महिना14 ते 18 भाडे बेकायदेशीर रित्या वसूल केलेले असून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ए पी एम सीचे माजी सदस्य शिवनगौडा पाटील आणि टेंडर अर्ज घातलेल्या व्यापाऱ्यांनी केला आहे.
ए पी एम सीअध्यक्ष आनंद पाटील आणि उपाध्यक्ष सुधीर गड्डे आदी सदस्यांनी बेकायदेशीर रित्या गाळे भाड्याने दिले आहेत इतर सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी उरलेल्या तीस दुकानांचा लिलाव करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार डी सी पर्यंत पोहोचली होती.
ए पी एम सी भाजीमार्केट मधील एकूण 134 दुकानांपैकी 102 दुकानांचा अधिकृतपणे टेंडर मागवून लिलाल करण्यात आला उरलेली 32 दुकाने अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित होती त्या गाळ्यांचा लिलाव झाला नव्हता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जाती जमातीचे अधिक व्यापारी नसल्यास गाळे सामान्य व्यापाऱ्यांना देऊ शकतात. तात्कालीन सेक्रेटरी यांनी सदर गाळे सामान्य व्यापाऱ्यांना द्यावे असा सरकारी आदेश आणला होता मात्र अद्याप त्या 32 गाळ्यांचा लिलाव होणे बाकी आहे असे असताना दर माह भाडे मिळवण्यासाठी ए पी एम सी सदस्यांनी सहा महिन्यांचे भाडे ऍडव्हान्स घेत गाळे भाड्याने दिले आहेत असा देखील आरोप करण्यात आलाय.
सुरुवातीला एस सी एस टी भाजी विक्रेत्यांचा या लिलावास आक्षेप असे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र बंगळुरू मधून टेंडर खुला करण्याचे आदेश आहेत त्याला तिलांजली देण्यात आली आहे.या प्रकरणी सदस्य वेळकाढूपणा करत आहेत तर सचिवांनी बदली करून घेतली आहे त्यामुळे काहीही करून टेंडर ओपन करा गाळे द्या अशी मागणी ते व्यापारी करत आहेत.श्रीधर अळवणी,सिध्दरामप्पा खोदमपुर, संदीप जक्काने,चंद्रकांत कोंडुस्कर,परशुराम बर्डे,गोपी पाटील,लक्ष्मण मोरे,मेहबूब कलमनी आदी उपस्थित होते.