भाजी मार्केट समस्या गंभीर बनली आहे शेती उत्पादकांनी आज आपली भाजी एपीएमसी अधिकारी व सदस्यांसमोर टाकून आपली नाराजी व्यक्त केली. 32 गाळ्यांचा प्रश्न गंभीर असतांना आज शेतकऱ्यांनीही आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट एपीएमसी मध्ये हलवण्यात आल्यापासून समस्या आणि संघर्ष रोज सुरू आहे, यातच भाजी विक्रेत्यांना दुय्यम दर्जा मिळत असल्याचा आरोप होत आहे. तर उत्पादक शेतकरी प्रवासाच्या वाढीव दराला कंटाळले आहेत, एपीएमसी समोर आंदोलन करण्याबरोबरच काही शेतकऱ्यांनी आपली नाराजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील व्यक्त केली.
कमी दर्जाचा माल असेल तरी दर कमी मिळत असताना भाडे देऊन एपीएमसीत न्यावा लागत असल्याने शेतकरी त्रासले असून याबद्दल संताप आहे काल रात्री चिडलेल्या व्यापाऱ्यांनी एपीएमसी गाजवली होती तर आज शेतकरी आंदोलनात उतरले आहेत.एकीकडे व्यापारी गाळे मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील ए पी एम सी मार्केट वर आक्षेप घेतला आहे.भाजी किल्ला मार्केट पेक्षा कमी दरात विक्री होत आहे किंबहूना ए पी एम सी मध्ये दर मिळायला तयार नाही शेतकऱ्यांना परवडत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.