सीमा भागातील वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.मागील वर्षी आषाढी एकादशी निमित एकच दिवस सुरू यात्रा स्पेशल ट्रेनची सोय करण्यात आली होती मात्र यावर्षी तब्बल सात दिवस ही विशेष ट्रेन चालणार आहे. नैऋत्य रेल्वेने पहिल्यांदाच सात दिवस रेल्वेची घोषणा केली आहे ही देवाची गाडी पुन्हा सुरू झाली आहे त्यामुळे वारकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
सिटीजन कौन्सिल यांच्या वतीने रेल्वे मंत्रालयाचे विशेष अधिकारी अनिश हेगडे यांची भेट घेऊन यात्रा स्पेशल गाडी सुरू करण्याची मागणी केली होती त्यानुसार रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून 7 जुलै ते 15 जुलै पर्यंत हुबळी बेळगाव पंढरपूर गाडी सुरू करण्याची घोषणा झाली आहे.
दोन स्लीपर आणि दहा जनरल अश्या एकूण 12 डब्यांची आषाढी वारी स्पेशल ट्रेन सात जुलै पासून सुरू होईल.ट्रेन क्रमांक 06527/06528 हुबळी बेळगाव मिरज रेल्वे सात ते पंधरा जुलै पर्यंत नऊ दिवस चालणार आहे.
या रेल्वे मुळे आषाढी एकादशीसाठी पंढरपूर ला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय होणार आहे.दरवर्षी हजारो बेळगाव सह उत्तर कर्नाटकातून देखील हजारो वारकरी पंढरपूर ला जात असतात बस तिकीट अनेकांना परवडणारे नसते या विशेष ट्रेन मुळे वारकरी बेळगाव हुन पंढरपूरला केवळ 80 रुपये रुपयात पोहोचता येणार आहे.
असा असेल या गाडीचे वेळा पत्रक
दररोज हुबळीहून सकाळी 5:20 ला निघणार असून बेळगावला 9:15 तर मिरज ला दुपारी 12:15 तर पंढरपूरला सायंकाळी 5:05 पोचणार आहे. वापसीत रात्री सात वाजता पंढरपूर हुन निघणार असून मिरजला रात्री 11:05 वाजता तर बेळगावला मध्यरात्री 1:30 वाजता हुबळीला पहाटे 4:15 वाजता पोचणार आहे.