वाढत्या शहरीकरणामुळे शहर आणि गाव येथील दरी ही तेवढीच वाढली आहे. गावाकडची संस्कृती शेतकऱ्यांचे जीवन पद्धती अशा अनेक विषयावर शहरातील लोक कोसोदूर राहिलेत. आज पुन्हा एकदा गावाकडे चला असे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र बेळगावात अशा पद्धतीचे कोणतेही कृषी पर्यटन झाले नसले तरी कृषी खात्याने यासंदर्भात पुढाकार घेऊन ते राबविल्यास अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
कर्नाटकात केवळ तुरळक प्रमाणात कृषी पर्यटन शेतकऱ्यांनी राबविले आहे. हे पर्यटन अनेकांचे लक्ष वेधून घेत असून त्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे. शहरी भागातील माणसांना गावाकडची आणि मातीची ओढ असते. ग्रामीण भागात शेती सोबत पूरक व्यवसायाची गरज असते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातल्यास कृषी पर्यटन ही संकल्पना राबवून आपला आर्थिक स्थर उंचाविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे असे प्रकल्प राबवून शेतकऱ्यांनी याकडे वळावे असे मत जाणकारातून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना स्वावलंबी बनायचे असेल तर शेतीबरोबरच जोडधंदे ही तितकेच महत्त्वाचे आहेत. शेतातच जोडधंदा मिळाला तर सोन्याहून पिवळे होईल त्यासाठी कृषी पर्यटनकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात कृषी पर्यटन नावाचा एक जोडधंदा शेतकऱ्यांनी राबविल्यास त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात 350 कृषी पर्यटन स्थळे सुरू करण्यात आले आहेत. त्यामधून अनेक शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. शाळेतील सहल असो व तरुणाईत माती बद्दल असलेले आवड. त्यामुळे कृषी व्यवसाय शेतकऱ्यांनी राबविल्यास त्याचा नक्की फायदा होईल असे मत व्यक्त होत आहे.