वारकऱ्यांच्या सेवेसाठी बेळगाव ते पंढरपूर साठी 7 ते 14 जुलै या काळासाठी रोज नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे. बेळगाव सिटीझन कोन्सिलने प्रयत्न करून रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्याकडून या रेल्वेस मंजुरी मिळवून घेतली आहे.
आज रेल्वेचे अधिकारी अनीश हेगडे बेळगाव रेल्वे स्थानकावर आले असता सिटीझन कोन्सिल चे सतीश तेंडुलकर आदीनी यांनी त्यांची भेट घेऊन वारकऱ्यांसाठी नवीन रेल्वेची मागणी केली. यावेळी तेंडुलकर यांनी सुरेश अंगडी यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता आपण लवकरात लवकर ही ट्रेन मंजुरीची घोषणा करतो असे अंगडी यांनी सांगितले आहे.
या प्रयत्नांमुळे हुबळी पंढरपूर ही नवीन रेल्वे गाडी बेळगाव सह सीमाभागातील वारकऱ्यांना मिळणार आहे.वारकरी पंढरपूरला जात असताना त्यांच्यासाठी वाढीव रेल्वेची गरज ओळखून ही मागणी करण्यात आली होती. या मागणीस यश आले आहे.यावेळी सिटीझन कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.