Monday, January 13, 2025

/

विठ्ठल नावाने दुमदुमले बेळगाव

 belgaum

आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यात विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते तालुक्यातील विविध मंदिरात सकाळपासूनच भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते सकाळी काकड आरती त्यानंतर भजन यामुळे चारा तालुका शहर विठ्ठलाच्या नाम कीर्तनात दंग झाला होता

दोन दिवसांपासूनच विविध तालुक्यातील मंदिरात रंगरंगोटी आणि स्वच्छतेची मोहीम राबविली यामुळे सारा मंदिर परिसर उजळून निघाला होता तालुक्यातील अनेक मंदिरात अभिषेक व इतर कार्यक्रम राबविण्यात आले भजनात तल्लीन होणारी वारकरी मंडळी अनेकांना मोहुन घेत होती तर काही शाळांमध्ये ही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

Dindi

अनेक प्राथमिक पूर्व प्राथमिक शाळांतून आजच्या दिवशी दिंडी काढण्यात आली होती लहान लहान विद्यार्थी वेशभूषा साकारत दिंडीत सामील झाले होते.प्रत्येकाच्या मोबाईल टीव्ही सोशल मीडियावर विठू नामाचा गजर दिवसभर चालूच होता.

शुक्रवारी पहाटेपासूनच विविध पूर्जा-अर्चा धार्मिक कार्यक्रम सुरू होते त्यामुळे वातावरण विठू ना माने तल्लीन झाले होते अनेक मंदिरात सकाळपासूनच आरती व भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामुळे काही मंदिरात रांगाही लागल्या होता भाविकांनी याचा मनमुरादपणे आनंद घेतला असून आषाढी एकादशी अनेकांनी उपवासी ठेवला होता

पहाटेपासूनच मंदिरांमध्ये गर्दी दिसून येत होती आषाढी निमित्त अनेकांनी महा तीर्थप्रसादाचा आयोजनही केले होते त्यामुळे भाविकांनी याचा लाभ घेतला सर्व तालुका आणि मंदिरात एकच आवाज ऐकू येत होता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.