गेले एक वर्ष झाले पहातोय आमदार राजीनामा देतंच आहेत त्यामुळे विश्वास ठेवावा का हा प्रश्न आहे.लांडगा आला रे लांडगा आला..असे होत असून लांडगा फक्त भेडसावुन पळून जात आहे अशी टीका वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.
बेळगावात काँग्रेसचे 11 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत सरकार कोसळेल का हा प्रश्न विचारला असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला आहे.
सध्याच्या सरकार वर आलेल्या संकटाबाबत स्पीकर निर्णय घेतील ऐन क्षणी संख्या बळ दाखवायची वेळ आल्यास वातावरण निर्माण होईल आजच्या घडीला सरकार कोसळणार नाही असा दावा त्यांनी केला.
सरकार बदल किंवा विधानसभा विसर्जन याचा निर्णय फ्लोर टेस्ट झाल्यावरच कळेल मी ऑपरेशन कमळ करणार नाही मात्र ते बंगळुरू मधून केले जाईल असेही त्यांनी नमूद केलं