Friday, November 15, 2024

/

तरुणाई गुरफटली हुंगण्यात

 belgaum

जिल्ह्यात एका बाजूला भीषण दुष्काळाची परिस्थितीला सामोरे जात असतानाच महागाईने अक्षरशा कहर केला आहे. दुसर्‍या बाजूला व्यसनाच्या विळख्यात अडकलेली तरुणाई अगदी कमी खर्चात झिंग येईल यासाठी नामी शक्कल लढवीत आहेत. व्हाइटनर यासह विविध प्रकारच्या औषधांचे सेवन आणि सिरिंजमधून नशा करीत असल्याची बाब समोर येत आहे. यातून मौजमजा करीत तरुणी मात्र व्यसनाच्या विळख्यात गुंतल्या जात आहे. ही बाब भविष्यात धोक्याची घंटा आहे.

जिल्ह्यात भयानक दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असताना पिण्याच्या पाण्यासाठी काही गावातील लोक कोसो पायपीट करून आपली तहान भागवीत आहेत. हीच परिस्थिती मुक्या जनावरांची ही आहे. जिल्ह्यात असणाऱ्या चारा छावण्यामुळे अनेक जनावरांना आधार मिळाला असला तरी काही चारा नसल्यामुळे जनावरांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. या साऱ्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे मौजमजा करणारे तरुण वेगवेगळ्या प्रकारांच्या नशेत गुरफटले जाऊन चुकीच्या मार्गाला लागत आहेत. हे सारे होत असताना पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.

Drugs

देशी-विदेशी दारूच्या दरात वाढ झाली आहे. परवडत नाही हे लक्षात येताच काही तरुण मादक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. या मादक व्यसनाच्या आहारी जाऊन नामी शक्कल लढवून अगदी कमी खर्चात झिंग येईल यासाठी नव्या व्यसनांचा आधार घेण्यास सुरुवात केली जात आहे. त्यामुळे यासाठी आताच पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यासह शहरातही हा प्रकार जोमाने सुरू झाला आहे. तरुणांबरोबरच तरुणींचा सहभाग असल्याची चर्चा आहे. शहरापासून निर्जन ठिकाणी मोटरसायकल घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी नशा करून ते साहित्य तिथेच फेकून देण्यात येते. केमिकलचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब भविष्यात धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.याकडे वेळीच लक्ष दिले न गेल्यास समस्या बिकट होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.