बेळगाव शहराची स्मार्ट सिटी मध्ये निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पातून वेगवेगळ्या योजना पुढे येत आहेत. आता लवकरच स्मार्ट सिटी योजना ई रिक्षाचा प्रकल्प घेऊन समोर येत असून शहरात स्मार्ट योजनेतून रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.
एकूण 31 रिक्षा शहरात धावणार असून त्यापैकी सात रीक्षा चालवण्याची संधी महिलांना मिळणार आहे. बेळगाव शहराचे नागरिक असलेल्या प्रत्येकालाच 15 जुलैपर्यंत ई रिक्षा साठी अर्ज करण्याची संधी देण्यात आलेले आहे. टिळकवाडी येथील स्मार्ट सिटी कार्यालयात जाऊन अर्ज करता येणार आहे .
पूर्वी वेगवेगळ्या योजनांमधून बेळगाव महानगरपालिकेने रिक्षा वाटल्या होत्या. आता ई रिक्षा वाटल्या जाणार असून त्यापैकी सात रीक्षा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी पुरुषांना 90 हजार 750 रुपये भरावे लागणार आहेत.
त्या रिक्षाच्या किमतीच्या 50 टक्के रक्कम ही पुरुषांसाठी भरावी लागणार असून महिलांना फक्त पंचवीस टक्के रक्कम भरून रिक्षा मिळवता येणार आहे. 45 हजार 375 रुपये भरून रिक्षा मिळणार असून ज्यांना रिक्षा मिळाली त्यांना ती चालवता येणार आहे. इतरांकडे हस्तांतरित करता येणार नाही.