नुकताच एक आंतरराष्ट्रीय मीडियाने प्रसिद्ध केलेला अहवाल आला, एक देश ज्या मध्ये सर्वाधिक महिला पायलट आहेत त्याचं नाव आहे भारत .जागतिक पातळीवर केवळ पाच टक्के महिला पायलट चे काम करतात. आणि भारतातील संख्या 13 टक्के अशी आहे, या बाबतीत भारताने जगाचे नेतृत्व केले ही अभिमानाची गोष्ट असतानाच बेळगावकरांना अभिमान वाटावा अशी एक गोष्ट आहे.
बेळगावातील श्रुती व्यंकटेश एक महिला पायलट आहे .ती बेळगाव चे नाव उंचावत आहे ..लहानपणी जेव्हा भविष्यात काय करणार असं विचारलं जायचं तेव्हा आम्ही कपाळाला आठ्या आणून विचार करायचो मात्र श्रुती तेव्हापासूनच सांगत होती की तिला पायलट व्हायचं आहे .
ती बोलते लहान असतानाच मला माहित होतं मी पायलट होणार आहे. त्यासाठी आर्थिक मदत असो किंवा मानसिक पाठिंबा असो सारे काही माझे पालक करत होते. बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेतल्यानंतर माझ्या पायलट होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली .गुजरात फ्लाइंग क्लब त्याबरोबर येथील संस्थेत मी सहभागी झाले. माझे पहिलेच फ्लाईट होते सेस्ना 172 एक लहान 2 सीटर क्राफ्ट त्यातून मी सुरुवात केली आणि पहिली वैयक्तिक आकाश वारी झाली. स्वतः एक एअरक्राफ्ट उडवायचे आणि ते सुरक्षित रित्या जमिनीवर उतरायचे हा अनुभव महत्त्वाचा होता .चार थेअरी परीक्षा पूर्ण केल्यानंतर दीड वर्षांच्या काळानंतर मी बीएससी एव्हिएशन या मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम आतून बाहेर पडले अभ्यासक्रम करत असतानाच पायलट लायसन ची परीक्षा दिली .त्या काळात अनेक पायलट ना भेटण्याची संधी मला मिळाली. भारतातून बाहेर फिरताना पायलट बरोबर बातचीत करत मी घडत गेले. त्यानंतर कॅलिफोर्निया येथील फ्लाईंग स्कूलमध्ये मला संशोधन करण्याची संधी मिळाली.
सुरुवातीला मी घाबरले होते मी वडिलांना सांगितले की तेथील खर्च फार जास्त आहे. पण अमेरिकेतून पत्र आलं तातडीने विजा मिळाला आणि तेथील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एक वर्ष लागले. तिथे मी दोन फ्लाइंग स्कूल बदली आणि पुढे गेले. पहीलाच भारतात परतल्यानंतर नोकरी मिळेपर्यंत अनेक महिने गेले मात्र दीड वर्षानंतर टाईप रेटिंग करण्याचे एका मित्राने सुचवले आणि मी ते करून घेतले ते ट्रेनिंग झाल्यानंतर कंपनी जॉईन केली स्पेनमधील माद्रिद येथे टाईप रेटिंग झाले. ग्लोबल ट्रेनिंग एव्हिएशन माद्रिदने मला अनेक चांगले निर्णय घेण्यास आज भाग पाडले आणि एअर बस सारख्या मोठ्या विमानावर पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळाली .काही महिन्यानंतर इंडिगो एअरलाइन्स ची परीक्षा देवून रुजू झाले. तेथे प्रशिक्षण घ्यावे लागले आणि दोन वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट मी केले आहे. आता यापुढे मी स्वतंत्र पायलट म्हणून काम करणार आहे असे ती सांगते.
सध्या श्रुती इंडिगो एअरलाइन्स मध्ये को पायलट म्हणून काम करते. तिच्या आईने बेळगावातच करिअर सुरू केले त्यानंतर सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंट मध्ये त्या अधिकारी म्हणून काम करतात. त्याचे वडील इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये चीफ मॅनेजर आहेत. तिच्या आजी-आजोबांनी तिला भरपूर मदत केली आहे. तिची बहीण प्रीती वेंकटेश एक फॅशन डिझायनर आहे .ती कायम आकाशात उडत असली तरी तिचे पाय जमिनीवर आहेत आणि बेळगावच्या मातीशी तिची नाळ जुळलेली आहे. स्काय इज द लिमिट असं तिला विचारलं तर ती म्हणते नो स्काय इज द होम.
News source:aab