माळी गल्ली येथील सरकारी मराठी शाळा क्र 4 समोर कचरा टाकण्यात येत आहे आणि त्याची उचलही वेळेत करण्यात येत नाही, त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे.
या कचऱ्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळले जात आहे दुर्गंधी पसरत असल्याने या शाळेत शिकणे कठीण झाले आहे त्यामुळे प्रकाराकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
नियमानुसार शाळेच्या समोर कचरा कुंड असता कामा नये मात्र या ठिकाणी अनेकदा विनंती करून देखील घाण कचरा टाकण्यात येत आहे शाळकरी मुलांचे आरोग्य बिघडल्यास यास महा पालिका आरोग्याधिकारी आणि पर्यावरण अधिकारी जबाबदार असतील असा देखील आरोप करण्यात येत आहे.
बेळगाव उत्तर चे आमदार अनिल बेनके यांनी आशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची झाडाझडती घ्यावी व यावर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.