रिक्षांच्या बंद मुळे विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड नुकसान होत आहे.कमिशनर, डीडीपीआय, डिसी आणि लेबर ऑफिसर यांची बैठक उद्या घेऊन लवकरात लवकर बंद रिक्षा सुरू करू अशी ग्वाही आज पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव शहरातील काही पालक आणि वर्दीच्या रिक्षा चालकांनी आज जारकीहोळी यांची भेट घेतली.
शहर परिसरात पाच हजार रिक्षा आहेत त्यात वरडीवाल्या ऑटोची संख्या लक्षणीय आहे सरकार 15 जुलै रोजी उच्च न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे गेले तीन दिवस शहरांत पालकांचे हाल होत आहेत अनेक ठिकाणी ट्राफिक जाम होत आहे हा त्रास कमी करावा अशी मागणी पालक ऑटो चालकांच्या शिष्टमंडळाने जारकीहोळी यांच्याकडे केली.
याबाबत गृह मंत्र्यांशी देखील चर्चा करू असे आश्वासन जारकीहोळी यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, पुंडलिक पावशे पालक ऑटो चालक आदींनी भेट घेऊन समस्या सांगितल्या.यावेळी आम्ही या समस्येवर उद्या बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.