धारवाड उच्च न्यायालयात न्यायाधीश गैर हजर असल्याने शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही त्यामुळे आरक्षण आणि वार्ड पुनररचना याचिकेवर अंतिम सुनावणी झालीच नाही.
बेळगाव मनपाचे आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचना चुकीची असल्याची याचिका वकील धनराज गवळी यांच्या नेतृत्वात काही माजी नगरसेवकांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेची शुक्रवारी 28 रोजी अंतिम सुनावणी होणार होती मात्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हजर न राहिल्याने सदर सुनावणी पुढे ढकलली असून 12 जुलै रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते वकील धनराज गवळी यांनी बेळगाव live ला दिली आहे.
मागील सुनावणीत उच्च न्यायालयात अडिशनल अडव्होकेट जनरल दिनेश राव आले होते त्यांनी बंगळुरू आरक्षण विरोधी याचिकेची प्रत हजर केली त्या नंतर 28 रोजी निर्णय देणार अशी माहिती न्यायाधीशांनी दिली होती मात्र आता 28 ऐवजी 12 जुलै रोजी याबाबतचा अंतिम फैसला होणार आहे.
12 जुलै रोजी निवडणूक आयोग आणि सरकार आपली बाजू कोर्टात मांडणार असून त्या दिवशी या विषयावर संपूर्ण सुनावणी होऊन निकाल दिला जाणार आहे.आता या याचिकेवरील निर्णय येताच महा पालिका निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्या नंतरच निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे.