belgaum

वर्दीच्या रिक्षाला अपघात पाच विद्यार्थी जखमी

0
3765
 belgaum

दुचाकीने शाळकरी रिक्षाला धडक दिल्याने वर्दीचा शाळकरी रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील पाच विध्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना सदाशिवनगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स समोर घडली आहे. मंगळवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

घटनास्थळा वरून मिळालेल्या माहिती नुसार
सदर जखमी झालेले विद्यार्थी मराठी विद्या निकेतन शाळेचे आहेत.ऑटोरिक्षात दहा मुले होती त्यापैकी पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनास्थळी वकील सुधीर चव्हाण यांनी सर्व किरकोळ जखमी विध्यार्थ्यांना इस्पितळात दाखल केले.

कलाश्री बागेवाडी 9 प्रतीक पाटील 8, अथर्व खनुकर वय 9 आणि कुमार निलजकर सर्व विध्यार्थी बी के कंग्राळी चे असून जखमी विध्यार्थी झाले होते त्यांच्यावर सिव्हील इस्पितळ आणि खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.बेळगावं रहदारी उत्तर पोलिसांत गुन्हा नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.