बंद घरात कुणी नसलेलं पाहून कुलूप तोडून आत प्रवेश करत घरफोडी करणाऱ्या पिरनवाडीच्या तीन युवकांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.त्यांच्या जवळील दीड लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केलेआहेत.
विनोद तानाजी हरजी वय 27,रोहित रवी राऊत वय 23,राहुल लक्ष्मण हुबळकर वय 23 सर्वजण रा.सिद्धेश्वर गल्ली पिरनवाडी अशी ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या युवकांची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
पिरनवाडी येथील सचिन माने हे 27 मे रोजी रात्री नातलगांच्या लग्नाला गेले असता घरात कोणी नसलेलं पाहून कुलूप तोडून घरात प्रवेश करत ट्रेजरी तील सुमारे दीड लाख किंमतीचे 34 ग्राम सोन्याचे आणि तीन हजार किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले होते. ग्रामीण पोलिसांनी वरीन तिन्ही चोरट्यांना अटक करत त्यांच्या जवळील चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेआहेत.
ग्रामीण पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा तपास लावल्यामुळे पोलिस आयुक्तांनी ग्रामीण पोलीस दलाचे तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.