काँग्रेस रोड वर सुरू असलेल रस्त्याचे काम केवळ एका बाजूने सुरू असलेली ट्राफिक त्यात राज्यपालांचा दौरा यामुळे गोगटे सर्कल उड्डाण पुलावर जाम, काँग्रेस रोडवरील ताणामुळे व्ही आय पी व्हिजिट मूळे आणि सायंकाळची वेळ असल्याने कपिलेश्वर उड्डाण जाम तर जिजामाता चौकात रस्त्यावर आलेल्या सांडपाण्या मुळे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल जाम अश्या तिन्ही ब्रिज वर गुरुवारी मेगा ब्लॉक पहायला मिळाला.
गोगटे सर्कल,ओल्ड पी बी रोड आणि कपिलेश्वर रोड ही तिन्ही उड्डाण पुलं बेळगाव शहराचे दोन भाग करतात सकाळच्या वेळी आणि सायंकाळी हजारो दुचाकी उत्तर बेळगाव मधून दक्षिणे कडे ये जा करीत असतात त्यातच काँग्रेस रोड वरून गोवा खानापूर कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील लक्षणीय आहे त्यामुळे ब्रिज असून रहदारीचा अडथळा निर्माण होतंच असतो.
सध्या काँग्रेस रोड चे काम सुरू असल्याने त्यातच राज्यपाल वजुभाई वाला हे व्ही टी यु कार्यक्रमाला आले असल्याने सकाळी आणि सायंकाळी याचा फटका सामान्य लोकांना बसला आहे.गुरुवारी सायंकाळी गोगटे सर्कल वर मेगा ब्लॉक अनुभवायला मिळाला अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पोलीस खात्याने काल रहदारीत बदल केले होते मात्र वाहनांची संख्या इतकी अधिक आहे त्यामुळं हे बदल कुचकामी ठरले जाम मुळे सामान्य जनतेला याचा फटका बसला आहे पोलिसांनी केवळ दंड वसुली कडे अधिक लक्ष न देता ट्राफिक जाम होणार नाही रहदारी सुरळीत करण्या कडे लक्ष देण्याची गरज आहे.