श्रीलंकन गोलंदाज चमिका के याने घेतलेले पाच बळी आणि दोन सलामीवीरां सह तीन फलंदाजांनी झळकावलेल्या अर्ध शतकांच्या जोरावर श्रीलंकन ए टीमने भारतीय ए टीमचा डकवार्थ लुईस नियमाच्या आधारावर सहा गडयानी पराभव केला.या विजया नंतर देखील मालिकेत 2-1अशी आघाडी मिळवली आहे.
बेळगावातील ऑटो नगर येथील के एस सी ए च्या मैदानावर तिसरा अनधिकृत एकदिवसीय सामना सोमवारी खेळवला गेला पाऊस आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार लंकेला विजयी घोषित करण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावत 291 धावा केल्या.भारतातर्फे पी चोप्रा याने शतक झळकावत 129 धावा केल्या तर हुडा याने 53 धावांचे योगदान दिले.लंके तर्फे किफायतशीर गोलंदाजी करताना चमिका के यानें दहा षटकात 30 धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंका संघाने 43.5 षटकात 266 धावा केल्या होत्या त्यावेळी पावसाने खेळ थांबवण्यात आला त्यामूळे लंकेला विजयी घोषित करण्यात आले. श्रीलंकेच्या वतीने सलामीवीर निरोशन डी याने 62 संगीत सी याने 88 तर स्नेहन जे याने नाबाद 65 धावा काढल्या.
चमिका के यानें दहा षटकात 30 धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद करत किफायतशीर गोलंदाजी केल्या त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. गेल्या दोन सामन्यात सलग शतके मारणारा ऋतुराज गायकवाड या सामन्यात खेळला नाही.