अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका नरधमास 22 हजार रुपयांचा दंड आणि दहा वर्षे कारावासची शिक्षा देण्याचा आदेश बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.
ज्योतेश शिवाजी नावी वय 23 रा.आंबेवाडी बेळगाव असे या पोस्को कायद्याखाली शिक्षा सूनवलेल्या नरधमाचे नाव आहे.
9 मार्च 2018 रोजी आंबेवाडी लक्ष्मी गल्लीतील 23 वर्षीय युवक ज्योतेश नावी याने त्याच गावच्या एका अल्पवयीन मुलीला महाराष्ट्रात नेऊन बलात्कार केला होता.या प्रकरणी काकती पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता.
आपल्या दुचाकीवरून भुदरगड तालुक्यातील शिलोळी गावात भाडोत्री खोली करून तिच्यावर आठवडाभर पाशवी बलात्कार केला होता त्या नंतर सदर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारी वरून न्यायाधीश पी नंजुडयया यांनी 25 साक्षीदार आणि 40 पुराव्याच्या आधारावर आरोपीला दहा वर्षे कारावास आणि 22 हजरांचा दंड ठोठावला आहे.या प्रकरणी सरकारी वकील एल व्ही पाटील यांनी काम पाहिले.