बेळगाव बंगळुरू तात्काळ ट्रेनचा तिकीट दर नियमित धावणाऱ्या राणी चन्नममा पेक्षा अधिक आहे हा दर कमी करावा नियमित गाडी एवढा ठेवावा अशी मागणी वाढू लागली आहे.बेळगाव बंगळुरू दरम्यान नियमित रेल्वे सेवा सुरू करा ही फार जुनी मागणी पूर्ण झाली.या गाडीमुळे शनिवार रविवार खाजगी प्रवाशी गाड्यांकडून होणारी लूट कमी होणार आहे.
रात्रीच्या प्रवासाची सोय करून देणारी बेळगाव ते बेंगळूर मार्गावर तात्काळ रेल्वे सुरू करण्यात आली आहे.29 जूनला सायंकाळी 6 वाजता या सेवेचे उदघाटन होईल. ही सेवा फक्त एक महिन्यासाठी असणार असून एक महिन्याच्या प्रतिसदा नंतर सदर रेलवे नियमित होईल की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे.
06525/06526 या क्रमांकाची बेळगाव बंगळुरू रेल्वे या सेवेसाठी फक्त एक महिना कालावधीसाठी सुरू होईल असे पत्रक नैऋत्य रेल्वेने काढले होते. 29 जून पासून बंगळुरू मधून तर 30 जून पासून बेळगाव मधून दररोज एक महिला ही ट्रेन सुरू होणार आहे.
गाडी क्रमांक 06526 बेळगाव बंगळुरू ही 30 जून पासून रात्री 9 वाजता बेळगाव मधून सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता बंगळुरूला पोहोचेल.या गाडीसाठी 2AC Rs 1755-3AC Rs 1235-SL Rs 465 असा दर ठेवण्यात आला आहे तो बेळगाव बंगळुरूला नियमितपणे धावणाऱ्या राणी चननममा ट्रेन पेक्षा अधिक आहे.राणी चन्नममा मध्ये 2AC-1310- 3AC Rs915- SL-Rs 335 असा दर आहे.
बेळगाव मधून रात्री 9 वाजता सुटल्यावर रात्री 11:10 वा.धारवाड 11:45 वा.हुबळी, हुबळी दक्षिण 2:00 वा.दावणगेरी, 4:10 अरसीकेरे 5:33 वा.तुमकुर 6:33 वा.यशवंतपूर 7 :00 बंगळुरू पोहोचणार आहे.