Sunday, January 12, 2025

/

ड्रेनेज पाणी थांबवा… मलप्रभा वाचवा

 belgaum

खानापूर शहरातील सांडपाणी व ड्रेनेजचे घाणपाणी मलप्रभा नदी पात्रात मध्ये मिसळले जात आहे. त्यामुळे मलप्रभा नदीचे पात्र दूषित होऊन जनावरे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

मलप्रभेचे हे पाणी थेट नदीत मिसळत असून त्यामुळे खानापुर च्या जवळील असलेल्या कुपटगिरी ,जळगा ,चापगाव यडोगा या भागातील माणसे आणि जनावरे धोक्यात आली आहेत.

Khanapur mes

जनावरांनी हे पाणी पिल्यास त्यांना वेगवेगळ्या आजारांचा संसर्ग होऊ लागला आहे . माणसांना वापरासाठीही हे पाणी योग्य नसल्याचे दिसून येत आहे. याबद्दल योग्य ती कृती होऊन हे नदीपात्र सुरक्षित करावे व माणसे आणि जनावरांचे धोक्यात आलेले जीवन वाचवावे अशी विनंती करण्यात आली आहे.

खानापूर तालुका म ए समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, अड अरुण सरदेसाई, मुरलीधर पाटील, महादेव घाडी, विलास बेळगावकर, अनिल पाटील, अविनाश पाटील हे उपस्थित होते.गेल्या काही वर्षांपूर्वी खानापूर ड्रेनेजसाठी 50 कोटींची योजना मंजूर झाली होती यासाठी खानापूर ने 11 लाख रुपये सरकारला भरले आहेत आता ती योजना 100 कोटींच्या वर गेलो आहे या योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी यशवंत बिरजे यांनी केली आहे केंद्रा कडून गंगा स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी खर्च केले जात आहेत आमची मलप्रभा देखील स्वच्छ करा असेही ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.