आयुष्य हे फार सुंदर आहे ते अधिक सुंदर करण्यासाठी माणुसकी अतिशय महत्त्वाची आहे. आज शिक्षणातून माणुसकी नाहीशी होत आहे अशा परिस्थितीत आपल्या मुलाचं करिअर घडवायचं असेल तर त्यांच्या हातात पुस्तके द्या, मोबाईल द्या, मात्र त्यातून काय घेतलं पाहिजे हे त्याला शिकवा’ असे विचार भाऊराव काकतकर कॉलेजचे प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या गौरव समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट आणि कै. बि के बांडगी शैक्षणिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यम शाळातिल दहावी परीक्षेत 85 टक्केहुन अधिक गुण घेतलेल्या 60 विद्यार्थिनींचा गौरव समारंभ रविवारी सकाळी पार पडला.
रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन विध्यार्थीनींना गौरविण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी चव्हाण हे होते तर पाहुणे म्हणून सह्याद्री सोसायटीचे संचालक एन बी खांडेकर व न्यू इंग्लिश स्कूल सातारा चे निवृत्त प्राचार्य आनंदराव कंग्राळकर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते हनुमान फोटोचे व स्वर्गीय बी के बांडगी यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. ट्रस्टचे उपाध्यक्ष अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले पाहुण्यांचा विविध संचालकांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते विध्यार्थीनींना गौरविण्यात आले .याचवेळी सीनियर सिटीजन फोरमचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी पहिल्या तीन विद्यार्थिनींना रोख रक्कम देऊन गौरविले.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्री मायाप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. जीवन काय आहे हे समजावून सांगण्यासाठी त्यानीअनेक उदाहरणे दिली. आपल्या मुलगा केवळ डॉक्टर,इंजिनिअर न होता प्रथम माणूस होण्याची गरज आहे. त्यासाठी त्याच्यावर तसे संस्कार करा ,आनंदी जीवन अधिक आनंदी कसे होईल हे सांगण्यासाठी त्यांनी नागराज मंजुळे ,जगज्जेता सिकंदर, विश्वास नांगरे पाटील यांची उदाहरणे दिली .आपल्या मुलाला सुरेश खाडे सारखा हातात पैसे आल्यावर आई साठी जमीन खरेदी करणारा चांभाराचा मुलगा व्हायचा आहे की रोज करोडो रुपये कमावणाऱ्या विजयपथ सिंघानिया ला रस्त्यावर आणणारा गौतम सिंघनिया करायचे आहे हे ठरवा असे ते म्हणाले
‘अपयशाने खचून न जाता जिद्दीने, चिकाटीने यशस्वी व्हा असा सल्ला एन बी खांडेकर यांनी दिला .वटपौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या या कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे सांगून आनंदराव कंगराळकर यांनी समाजासाठी आपण काहीतरी दिले पाहिजे ही जाणीव लक्षात ठेवा असे सांगितले
तालुक्यात पहिला आलेली महाराष्ट्र हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी मंगनाईक आणि विमल तुळजाई यांनी आपले विचार व्यक्त केले. संभाजीराव चव्हाण यांच्या अध्यक्षय समोरोपानंतर रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले .सूत्रसंचालन नेताजी जाधव व आर के कुटरे यांनी केले