मिस प्रिन्सेस इंडिया 2019 हा किताब रयत गल्ली वडगाव येथील स्नेहल राजेंद्र बिरजे हिला मिळाला आहे त्यामुळे बेळगाव च्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिनांक 9 जून रोजी बेंगलोर येथे मिस प्रिन्सेस रियालिटी सौंदर्यवती स्पर्धा झाली या स्पर्धेत तिने हा बहुमान मिळविला आहे. सिल्वर स्टार इंडिया ओशन तर्फे 1997 पासून सुरू असलेल्या बेंगलोर येथील शाखेतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये तिला मिस प्रिन्सेस 2019 हा किताब देण्यात आला.
तसेच स्नेहलची लहान बहीण सेजल हिला देखील मिस प्रिन्सेस नॉर्थ कर्नाटका हा किताब देऊन गौरविण्यात आले आहे.स्नेहल ला हा किताब मिळाल्याने आगामी मिस वर्ल्ड व मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे तिला वडील राजेंद्र बिरजे व आई माधुरी बिरजे यांचे प्रोत्साहन लाभले आहे.