शॉर्ट सर्किट मुळे हार्डवेयर दुकानातील लाखों रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्याची घटना वीर भद्र नगर येथे घडली आहे. या घटनेत सुमारे 20 लाखांच्या हार्डवेअर वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीरभद्र नगर पाहिले क्रॉस मधील नागराज देसाई यांच्या सागर ट्रेडर्स या गोडाऊन मध्ये बुधवारी पहाटे आग लागली होती या आगीत मोठ्या प्रमाणात हार्डवेअर वस्तू जाळल्या आहेत. दुकानात 60 लाखाहून अधिक किंमतीचे हार्डवेअर आणि प्लॅनबिंग समान होते त्यापैकी जवळपास 20 लाख किंमतीच्या सामानाचे नुकसान झाले आहे.
पहाटे आग लागताच स्थानिक लोकांनी फायर ब्रिगेडला पाचारण केले अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या त्यांनी आग विझवल्या मुळे मोठी हानी टळली.शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा संशय सागर ट्रेडर्स चे मालक नागराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.अग्निशामक दल अधिकारी आणि स्थानिकांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करून आग विझवत मोठे नुकसान टाळल्याने दोघांचे आभार देखील त्यांनी मानले आहेत.या प्रकरणी मार्केट पोलिसांत फिर्याद दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.