अंकलगी ता.गोकाक येथील गोरक्षक शिव कुमार उपपार वय 19 यांनी अलीकडे हिरेबागेवाडी येथे पोलिसांनी केलेला आत्महत्येचा दावा संशयास्पद असून मागे घातपात झाल्याचा संशय श्रीराम सेना हिंदुस्तान या संघटनेने या प्रकरणाची सखल चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.
श्री राम सेना हिंदुस्तान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या डी सी ऑफिसच्या समोर जमले आणि शिव कुमार प्रकरणाची चौकशी करा अशी जोरदार मागणी घोषणा देत करण्यात आली.त्या नंतर या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारीच्या सहाययकाला देण्यात आले.
त्यांनी निवेदनात असं म्हटलं आहे की शिव कुमार याचं मूळ गाव गोकाक अंकलगी असून हिरे बागेवाडी येथील ए पी एम सी च्या स्वच्छता गृहात आत्महत्या का करेल ?असा प्रश्न उपस्थित केला आहे.गेल्या काही दिवसा पासून त्याला धमकीचे फोन येत होते कॉल डिटेल मधून त्याचा तपशील घ्यावा आणि गरज लागल्यास संशयितांची चौकशी करावी या शिवाय फेसबुक live वरून कांही संशयी तांची नावे शिव कुमार यांनी घेतली आहे त्यांची चौकशी अशी देखील निवेदनात केली आहे.
यावेळी श्री राम सेना(हिं)अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर,जिल्हा अध्यक्ष राजू जाधव आणि भरत पाटील यांच्या सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.