लूटमार करून पळून जाणाऱ्या दोघांना फिल्मी स्टाईल मध्ये पाठलाग करून पकडत शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी सिंघम रिटर्न्सची झलक दाखवली आहे. गोमटेश मधील एक कर्मचाऱ्याचा पाठलाग करून त्याच्या जवळील रोख रक्कम आणि मोबाईल लुटणाऱ्या लुटारूना पकडण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे.
राहुल गुरुनाथ नायकवाडी वय 24 रा. नवी गल्ली शहापूर,अक्षय प्रदीप हेरेकर वय 21 रा. मारुती गल्ली खासबाग,आणि आकाश प्रदीप हेरेकर वय 20 रा. मारुती गल्ली खासबाग अशी त्यांची नावे असून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.
सन्नकल्लापा जनगौडा( वय 52) रा. अलारवाड यांचा तिघा लूटमार करणाऱ्यानी गोमटेश पासून पाठलाग करत खासबाग धाकोजी हॉस्पिटल जवळ अडवले व चाकूचा धाक दाखवत 15 हजार किंमतीचा मोबाईल फोन व दोन हजार रुपये लुटून घेतले होते. सन्नकल्लाप्पा यांनी आरडाओरड करताच लोक जमले त्यावेळी एक आरोपी समोरच्या अपार्टमेंट पळाला तर इतर दोघे जुने बेळगाव कडे पळाले.घटनास्थळी लागलीच शहापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले काही पोलिसांनी लोकांनी एकाचा अपार्टमेंट मध्ये शोध घेतला .स्थानिकांनी एका दरोडेखोराची धुलाई केली तर जावेद यांनी अन्य दोघांचा जुने बेळगावच्या दिशेने पाठलाग करत शोध सुरू केला त्यावेळी जुने बेळगाव नाका पुढच्या वाइन शॉप पर्यंत 300 मीटर अंतर फिल्मी स्टाईल प्रमाणे पळत जाऊन त्यांनी दोघांना गजाआड केले.
लोकसभा निवडणूक आचार संहितेत बदली झाल्यावर ते बाहेर होते. पुन्हा एकदा नुकतेच रुजू होत शहापूर पोलीस स्थानकाची दुसरी इनिंग सुरू केली आहे. पहिल्या कारकिर्दीत अनेक चांगले उपक्रम हाती घेऊन शहापूर सिंघम बनले होते .त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली असून दरोडेखोरांना गजाआड करत कार्याची चुणूक दाखवून दिली आहे.