बेळगावात भारताचा लंकन ए टीमवर सलग दुसरा विजय मिळवला आहे.सलामी वीर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांच्या जोरावर भारतीय अ संघाने दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात दहा गड्यांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली.
बेळगाव येथील के एस सी ए स्टेडियम वर भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे.श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सात गडी बाद 242 धावा केल्या.श्रीलंके तर्फे एस जयसूर्या याने 101 धावा केल्या.
प्रत्त्युत्तर दाखल खेळताना केवळ 33.3 षटकात दहा गडी शिल्लक ठेवत 243 धावा करत मोठा विजय केला. भारता तर्फे सलामी वीर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी नाबाद शतके झळकावली.ऋतुराज गायकवाड यानें 14 चौकार आणि 4 षटकाराच्या साहाय्याने 94 बॉल मध्ये 125 धावा करत सलग दुसरे शतक झळकावले तर त्याचा साथीदार शुभमन गिल याने 14 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने 94 बॉल मध्ये 109 धावा केल्या.
शतकवीर शुभमन गिल याला सामनावीर पुरस्कार दिला गेला तिसरा वन डे सामना 10 रोजी बेळगावतच होणार असून प्रेक्षकांना मोफत असेल.