गावातील मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने गेल्या कित्येक महिन्यापासून मागणी करून देखील पी डी ओ ची नियुक्ती झाली खरी मात्र ते पी डी अनियमित असल्याने संतप्त कलखांब ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीला टाळे ठोकत आंदोलन केले आहे.
कणबर्गी या महा पालिकेच्या कार्यक्षेत्रा नंतर अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या कलखांब गावात अनेक समस्यांची वाणवा आहे अनेक विकास कामे रखडली आहेत अश्या परिस्थितीत नवीन पी डी ओ कोणतीच कामे करीत नाहीत ते अनियमित असतात याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे.
शुक्रवारी सकाळी गावातील महिलांनी पी डी ओ सेक्रेटरी गैर हजर असल्याने थेट पंचायतीला टाळे घातले आहे.कलखांब हे गाव यमकनमर्डी विधानसभा मतदार संघात येते या भागाचे आमदार सतीश जारकीहोळी हे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील याकडे लक्ष देऊन कलखांब गावची समस्या सोडवण्याची गरज आहे.