शहरात दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती केली आहे.त्यामुळे हेल्मेट विक्री करणारे मिळेल त्या ठिकाणी रस्त्याकडेला दुकान मांडत आहेत. पालिकेच्या जागेवर हेल्मेट विक्री सुरू आहे. प्रशासनाने योग्य ती समज द्यावी अशी मागणी केली जात आहे.
बेळगावात हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई होत आहे. ग्रामीणमधील अनेक जण नोकरी व्यवसायानिमित्त शहरात ये-जा करतात. दंडाचा आर्थिक फटका बसू नये, म्हणून अनेक जणांनी फूटपाथवरील फुट पाथ वरील हेल्मेट खरेदी केले आहेत.
शहरात रस्त्यांच्या कडेलाही काही विक्रेते हेल्मेटची विक्री करीत आहेत. या हेल्मेटच्या खोक्यावर 100 ते 300 रुपये अशी हेल्मेटची किंमत आहे रस्त्यावर मिळणाऱ्या हेल्मेटच्या दर्जाबाबत काहीही सांगता येत नाही. पण रस्त्यावरील हेल्मेट प्रशासनाला कसे काय चालते ?ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात रहदारीच्या समस्येने धुमाकूळ घातला असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी हेल्मेटविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची सक्ती करा पण रहदारीच्या रस्त्यावरील आणि फूटपाथवरील समस्या ही दूर करा अशी मागणो वाढत आहे.