बेळगुंदी नाला ते बिजगर्णी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. एक दिवसाच्या पावसातच बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत. ग्रामीण भागातील हा प्रमुख भाग जोडणाऱ्या रस्त्याची परिस्थिती पहा ,खालील छायाचित्रात तुम्हाला दिसेल, त्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्ता नाहीच तर नुसते खड्डेच ही परिस्थिती.
पहिल्या पावसातच ही परिस्थिती आहे तर पावसाळा जोर सुरू झाल्यावर नेमकी परिस्थिती काय होईल याचा अंदाज न केलेलाच बरा, या भागात जाणाऱ्या वाहनांना खड्ड्यातून वाट काढावी लागत आहे.
या परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची सध्या अवस्था वाईट आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मातीची व चिखलाची दलदल झाली असून लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्याला कारणीभूत आहे .
बेळगाव ग्रामीणच्या आमदारांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप या भागातील नागरिक करत आहेत. काँग्रेस मधील अंतर्गत राजकारणातच त्यांचा जास्त वेळ जात असून विकासकामे करण्यास त्यांना वेळच मिळत नाही अशी परिस्थिती आहे. या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना सुधारण्याची गरज होती. रस्ता नव्याने तयार करण्याची गरज आहे.
मात्र बेळगाव ग्रामीण भागातील रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. लवकरात लवकर रस्ता होण्याची गरज आहे. पण विकासाकडे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे या पावसाळ्यात काय होईल याची कल्पना न केलेली बरी अशी अवस्था निर्माण झाली आहे .
दुर्लक्ष केलेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन रस्ता करायची गरज होती, आता पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे आता रस्ता करणे अवघड असून किमान तात्पुरती काहीतरी व्यवस्था करावी ही मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील इतर अनेक रस्त्यांचीही चाळण झाली असून पावसाळ्यातील प्रवास धोकादायक आहे.