बेळगावचे माजी नगरसेवक आणि वकील रतन मासेकर यांनी प्रादेशिक आयुक्त व महानगरपालिकेचे सध्याचे प्रशासक पी ए मेघांनावर यांना एक पत्र देऊन वडगाव आणि परिसरातील ड्रेनेज मेनहोल ची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भातील निवेदन त्यांनी सादर केले. वडगाव भागात हेस्कोम ने खुदाई करून लाईन घालताना व्यवस्थेचे तीन तेरा उडवले आहेत, यामुळे ड्रेनेज चे सांडपाणी विहिरी व कूपनलिका मध्ये जाऊन नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. महानगरपालिकेने नादुरुस्त झालेले ड्रेनेज मेनहोल लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांचा जीव वाचवा अशी मागणी त्यांनी केली आहे.
ऐन पाणी टंचाईत ड्रिनेज चे पाणी विहिरीतून मिसळल्याने पिण्याचे पाणी दूषित झाले आहे सोनार गल्ली वडगांव मधील प्रवीण पाचंगे,येळ्ळूर रोड मंगाई नगर येथील गजानन पाटील,आदर्श नगर पटवर्धन ले आऊट मध्ये रुपचंदानी यासह शहरातील अनेक विहिरींचे पाणी दूषित बनले आहे याला हेस्कॉम जबाबदार आहे असा आरोप माजी नगरसेवक रतन मासेकर यांनी केलाय.प्रादेशिक आयुक्तांनी हेस्कॉम अधिकारी महा पालिका आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
अद्याप पावसाला जोरदार सुरुवात झालेली नाही मात्र पाऊस सुरू झाल्यास हे सांडपाणी मोठ्या प्रमाणात ड्रेनेज मेन होलमधून विहिरी आणि इतर पाण्याच्या ठिकाणी मिसळणार असून त्याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी मेघनावर यांच्याकडे करण्यात आली आहे.