पिण्याचे पाणी मिळत नसल्याने खडेबाजार आणि परिसरातील महिला वर्गाने आज रास्तारोको केला आहे. पाण्यासाठी भर बाजारपेठेत महिला रस्त्यावर येण्याची ही पहिलीच घटना असून पोलीस उपस्थित झाले आहेत.
आम्हाला वेळेत पाणी द्या अशी या महिलांची मागणी आहे. रास्तारोको मागे घ्या अशी विनंती पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांनी केली असून महिला संतप्त झाल्या आहेत.
भर पावसात महिलांचे आंदोलन सुरूच होते, त्यांना विनंती करून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडण्यात आले. गणपत गल्ली व खडेबाजार कॉर्नर वर रस्ता अडवण्यात आल्याने रहदारी कोंडली होती.
बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच असे आंदोलन झाले असून प्रशासनाला दखल घ्यावीच लागेल,मध्यवर्ती शहरात गेल्या महिन्यापासून पाण्याचा तुटवडा आहे. बेळगाव live ने सुद्धा याबद्दल वृत्त प्रसिद्ध करून महिला वर्गाला होणारे त्रास दाखवले होते. तसेच या अन्यायाला वाचा फोडली होती तरीही दखल घेतली न गेल्याने पहाटेपासून वणवण फिरून पाणी भरणाऱ्या महिलांचा
आज कडेलोट झाला असून त्या रस्त्यावर उतरल्या होत्या.