गेल्या चोवीस तासात बेळगाव, चिकोडी, एकसंबा, सौंदत्ती यल्लमा आदी भागात मान्सूनपूर्व पावसाने झोडपले आहे. सौंदत्ती यल्लमा यासह इतर भागात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. ती मात्र या दुष्काळी भागात पावसाने हलका दिलासा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव सध्या जोरात सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात मान्सून आगमन होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात शेती कामांना वेग आला आहे. या भागात बटाटा सह इतर पिके लागवड करण्यात येत आहेत.
6 जून रोजी मान्सून दाखल होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असली तरी अजूनही मान्सूनपूर्व पावसाचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळग्रस्त भागात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले असून याचा दिलासा मात्र शेतकऱ्यांना लागून राहिला आहे. लवकरात लवकर मान्सून दाखल होणार अशी शक्यता आहे.
मोसमी वारे यंदा तब्बल दोन आठवड्यांच्या विलंबाने जिल्ह्यात दाखल होत आहेत. अशीच परिस्थिती इतरत्रही आहे. मात्र मान्सूनपूर्व पावसाने दिलेल्या सलामी मुळे साऱ्यांना दिलासा मिळाला आहे हे लवकरात मान्सूनचे नियमित आगमन व्हावे अशी अपेक्षा साऱ्यांना लागून राहिले आहे.