Tuesday, February 11, 2025

/

पाठयपुस्तके चुका प्रकरणी ‘प्रकाशक पाठयपुस्तक समितीवर’ होणार कारवाई

 belgaum

मराठी पाठय पुस्तकात हजारोंच्या संख्येने असलेल्या चुका आहेत त्या दुरुस्त केल्या जाणार असून पाठय पुस्तक समिती प्रकाशकावर कारवाई करा असे आदेश जिल्हा पंचायत सी इ ओ डॉ राजेंद्र यांनी दिले. मंगळवारी बेळगाव जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मराठी पाठयपुस्तकांचा मुद्दा चर्चेवर आला असताना ते बोलत होते.

आगामी दोन दिवसात चार तज्ज्ञांची कमिटी नियुक्त करून प्रूफ रिडींग करा आणि दोन दिवसात मला अहवाल सादर करा पाठयपुस्तक निर्देशालयाना स्वतः पत्र लिहून चुकांची दुरुस्ती करून पुन्हा एकदा पुस्तके प्रकाशित करू असे आश्वासन त्यांनी दिले.

स्थायी समितीत मराठी पुस्तका बाबत गंभीर चर्चा झाली शिक्षणाधिकारी पुंडलिक यांनी का हा विषय आमच्या निदर्शनास आणून दिला नाही असे म्हणत सी इ ओ यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. जर हा विषय अगोदर समजला असला बंगळुरू पाठयपुस्तक निर्देशकाना कल्पना देऊन यावर तोडगा काढता आला असता मात्र तुम्ही दिरंगाई केला आहेअसें खडे बोल राजेंद्रन यांनी सुनावले.स्थायी समितीत चर्चा झाली असताना असा गंभीर विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे तुमचे कर्तव्य आहे थेट बैठकीत चर्चा होते ही तुमची चुक आहे असेही ते म्हणाले.

Ceo zp rajendran

चुकीची पुस्तके छापून मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चुका असलेली मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्याना इथे बोलवा त्यांना अटक करा अशी संतप्त मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली

चुकीची प्रिंट झालेली पुस्तके सरकारला परत पाठवा किंवा पुन्हा प्रिंट करा असा ठराव आम्ही स्थायी समिती बैठकीत केला होता चुका तपासण्या अगोदर शाळेत मुलांना ही पुस्तके वितरित केली आहेत याला शिक्षणाधिकारी जबाबदार आहेत असा आरोप शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी केला.या स्थायी समिती बैठक होऊन 15 दिवस उलटले असताना अधिकारी गप्प का ते कामचुकारू आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशीही मागणी गोरल यांनी केली.

जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.अध्यक्षा ऐहोळे यांच्या बाबत माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्या का अनुपस्थित आहे अशी विचारणा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली त्यावर सी इ ओ यांनी त्या आजारी असल्याचे कारण दिले त्यावर नाराज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नैतिकता स्वीकारत अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.सीमेवरील गावात पाणी टंचाई भासत आहे त्यामुळे कोयनेतून महाराष्ट्राने कर्नाटकासाठी 4 टी एम सी पाणी सोडावे अश्या मागणीचा ठराव देखील संमत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.