विमानतळ संचालकांनी ठेवला ओपन आवर

0
125
Airport bgm
 belgaum

विद्यार्थी उद्योजक कलाकार आणि नागरिकांच्या वतीने आपल्याला अनेक संदेश आणि सूचना येत आहेत .बऱ्याच जणांना मला भेटून सल्ला द्यायचा आहे .

अशांसाठी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी सकाळी 11 ते दुपारी बारा हा एक तास ओपन आवर म्हणून ठेवण्यात आला आहे. असे ट्विट सांबरा विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांनी केले आहे.

 belgaum

शनिवारी एक तास नागरिकांसाठी खुला ठेवून सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिले आहे. त्या वेळेत विमानतळावर कुणीही या आणि विमानतळासंदर्भात काही समस्या असतील प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या विचारून घ्या असे ट्विट करून राजेश कुमार मौर्या यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे.

बेळगावचे विमानतळ हे बेळगावकरांच्या दृष्टीने आवडीचे आणि अभिमानाचे ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्या दृष्टीने काही सुधारणा व्हाव्यात अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात येणे अपेक्षित आहे. या अपेक्षांचा विचार करूनच हा ओपन आवर ठेवण्यात आला असून त्याचा लाभ प्रत्येकाने घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.