जुने बेळगाव कोरवी गल्ली येथील एका मटका अड्ड्यावर धाड टाकून मटका खेळणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे.शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वात शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी कोरवी गल्ली मटका अड्ड्यावर धाड टाकत अमित परशराम पाटील वय 25 व नागेश केदारी जयाचे वय 28 यांना अटक केली तर अन्य काही जण फरारी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या कडून 51 हजार 30 रुपये रोख रक्कम,मटका चिट्टी आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. अटक केलेल्या दोघांची चौकशी केली असता उद्यमबाग येथील मटका बुकी सुनील मजुकर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी दोघा मटका बुकीवर कारवाई करत पाच हजार रुपये जप्त करण्यात आले होते त्यानंतर या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.