जगातील सर्वात स्वस्त 30 रुपयात वॉटर फिल्टर तयार केलेला आणि त्याचे आपल्या नावे पेटंट घेऊन जगप्रसिद्ध झालेला बेळगावचा निरंजन कारगी आपल्याला माहीत आहेच. आता त्याने आपल्या या शोधातून वॉटर फिल्टर चे नवीन रेंज तयार केले आहेत. त्याच्या nirnal कंपनीतर्फे हे प्रॉडक्ट जगात फेमस होत आहेत.
निरंजन हाच nirnal चा संस्थापक आहे. शाळेच्या मैदानावर खेळताना त्याने आपले पहिले फिल्टर तयार केले. 30 रुपयांचे ते फिल्टर कोणत्याही बाटलीला जोडून 100 वेळा वापरता येत होते. निरंजन ने याचे पेटंट मिळवले होते. विदेशातही त्याला मागणी वाढली आहे.
त्याने तयार केलेले अल्ट्रा फिल्टर विजेशिवाय चालते आणि त्यातील जल शुद्धीकरण घटक योग्य वापर केल्यास 2 ते 5 वर्षे टिकू शकते.त्याची किंमत फक्त 1999 इतकी आहे.
वेगवेगळ्या कंपन्यांचे वॉटर फिल्टर अतिशय महाग आहेत. ते चालण्यासाठी मुख्य म्हणजे वीज लागते पण निरंजन ने बनवलेल्या फिल्टर ला वीज लागत नसल्याने विजेशिवाय पाणी शुद्ध करण्याचे हे यंत्र कमी खर्चिक असून सामान्य लोकांना परवडणारे आहे.
समुद्राचे खारट पाणी पिण्याच्या पाण्यात बदलण्याचे तंत्र शोधण्यासाठी तो संशोधन करत आहे. आफ्रिका, यु ए ई व इतर देशातून लोक संपर्क करून त्याचे फिल्टर घेत आहेत. चला आम्हीही निरंजन ला फोन करून त्याच्या या संशोधनाचा लाभ घेऊया. निरंजन चा क्रमांक आहे. +91-779-533-9714