बार असोसिएशन च्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या संख्येवर अर्ज अवैध ठरवल्याने नाराज झालेल्या वकिलांनी घातलेल्या गोंधळा नंतर पुन्हा नवीन निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीवर गोंधळाचे सावट होते काल शुक्रवारी झालेल्या अर्जाच्या छाननीत 20 हुन अधिक अर्ज रिजेक्ट करण्यात आले होते त्यामुळे इच्छुक असलेल्या नाराज वकील आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूक कार्यालयात गोंधळ घातला होता काही वकील तर निवडणूक प्रक्रिये विरोधात न्यायालयात जाणार होते.
शेवटी बार असोसिएशने बैठक घेऊन पुन्हा नवीन निवडणूक प्रक्रिया जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या बाबत मंगळवारी पुन्हा एकदा सर्व समावेशक बैठक घेऊन त्यात हा निर्णय घोषित केला जाणार आहे मंगळवारी नवीन प्रक्रिया तारीख जाहीर केली जाणार आहे.
शुक्रवारी निवडणूक उमेदवारी अर्ज व्यवस्थित रित्या भरून देखील मुद्दाम अर्ज अवैध ठरवण्यात आलेत असा आरोप करत काही वकिलांनी तक्रार दाखल केली होती.शनिवार हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता मात्र वकिलांच्या तक्रारी नंतर पुन्हा नवीन निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार आहे.निवडणूक अधिकारी एल के गुरव यांच्या नेतृत्वाखाली अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली होती.
अध्यक्ष पदाच्या एक जागेसाठी विध्यमान अध्यक्ष एस एस किवडसण्णावर, ए जी मूळवाडमठ दिनेश पाटील यांचा अर्ज वैध तर धनराज गवळी,सुनील सानिकोप, महेश कुलकर्णी आणि ए एम पाटील यांचे अध्यक्ष पदासाठीचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले होतेउपाध्यक्ष पदांच्या दोन जागांसाठी वकील सुधीर चव्हाण आणि विठ्ठल कामते यांचे अर्ज रिजेक्ट तर सचिन शिवांनावर सी टी मजगी गजानन पाटील लक्ष्मण पाटील आणि जे एस मंदरोळी यांचे अर्ज वैध ठरले होते.