बेळगाव हे कर्नाटकाचे असल्याचे दाखवण्यासाठी कर्नाटक प्रशासन अनेक माध्यमातून प्रयत्न करत आहे. मात्र हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. सध्या बेळगाव येथे देण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात कन्नड घुसडण्यात आले असून मराठीतही असंख्य चुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य चुका सुधारण्यात जाणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. यापुढे तरी अशा चुकांवर आळा घालून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी हा मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. वारंवार अशा चुका होत असताना तुम्ही गप्प कसे बसता असा जाब विचारून यापुढे चुका केल्यास गय केली जाणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे यापुढे तरी या चुका सुधारतील का की पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था होणार असा प्रश्न आहे.
इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकात मराठी माध्यमातील सर्व विषयात भरमसाठ चुका करून अधिकाऱ्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे या चुका सुधारण्यासाठी पुढील वर्षाचे वाट पाहावी लागणार आहे. आणि या चुका पहिल्यांदाच नाही तर अशा अनेक वेळा चुका करण्यात आल्या तरी देखील प्रशासनाला आपला आडमुठेपणा सोडण्यास लाज वाटत नाही.
अधिकाऱ्यांच्या या चूका सुधारण्यासाठी शिक्षकांची कसं लागले आहे. हाच मुद्दा उपस्थित करून जिल्हा पंचायतीचे शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे यापुढे तरी या चुका सुधारतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रमेश गोरल यांनी शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांना याबाबत खडसावले असून यापुढे तुमची गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे. त्यामुळे यावर्षी झालेल्या चुका पुढील वर्षी सुधारतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे