कन्नड फलकासाठी दादागिरी करून दोन भाषिकांच्या मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या कानडी गुंडांना आवरा आणि कार्यवाही करायासाठी *महाराष्ट्र्र एकीकरण समिती*, आणि *युवा समिती* मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केल्यावर लागलीच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या अनेकांनी शांत असलेल्या बेळगावला कन्नड संघटनांनी अशांत करू नये अशा शब्दात टीका केली होती अखेर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी सकाळी अकरा वाजता बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.तरी सर्व मराठी भाषिकांनी सोमवार दिनांक *17/6/2019 रोजी सकाळी 11 वाजता* जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन देखील युवा समितीने केले आहे.