गेल्या काही दिवसात मराठी माणसात असलेली मरगळ दूर करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून नेतृत्वासाठी युवकांना सामावून घेणार आहेत.
येळ्ळूर विभाग म ए समितीची बैठक सोमवारी शांताराम कुगजी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी येळ्ळूर तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील होते.
येळ्ळूर विभाग म ए समिती बळकट करण्यासाठी युवकांना सामावून घेऊन सक्रिय सहभाग करुन सिमाप्रश्नाची माहिती व ओढ निर्माण करण्यासाठी नजीकच्या काळात कार्यरर्ता चिंतन शिबिर आयोजित करण्याचे ठरवले आहे.या शिवाय येळ्ळूर विभाग म ए समितीची बैठक महिन्यातुन एकदा घेण्यात यावी असे कार्यकर्त्यानी सुचित केले तसा देखील ठराव करण्यात आला आहे.
येळ्ळूर समिती जो निर्णय घेते त्याची अंमलबजावणी सीमा भागात होते हा इतिहास आहे इतर घटक समिती कधी युवकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतात हे पहावे लागेल.
या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली. सर्व प्रथम माजी आमदार संभाजी पाटील, कुस्ती समिक्षक.दत्ता हट्टीकर,किसनाबाई जाधव,मल्लाप्पा घाडी यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.गेल्या लोकसभा निवडणुकीत येळ्ळूर विभाग म ए समितीच्या वतीने येळ्ळूर मधून निवडणूक लढवलेले समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते नागेश बोबाटे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.यावेळी एल आय पाटील, वामन पाटील, महादेव मेणसे,शांताराम कुगजी, दुध्दाप्पा बागेवाडी,उदय जाधव, रमेश मेणसे,शिवाजी गोरल, बाळु पाटील, राकेश परिट,नागेश बोबाटे, राजू उघाडे,राजू पावले,परशुराम परिट,प्रकाश अष्टेकर, अजित पाटील, विलास घाडी,गोपाळ घाडी,सतिश देसुरकर आदी उपस्थित होते.