प्रादेशिक आयुक्त पी ए मेघण्णावर यांनी बेळगावं महापालिकेच्या प्रशासक पदाची कार्यभार स्वीकारला आहे. नुकताच त्यांची प्रादेशिक आयुक्तपदी बदली झाली होती.
पालिका प्रशासक पदाची सूत्रे घेताच त्यांचा दलित संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. पी ए मेघण्णावर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेच्या कार्यकाळात बेळगाव महा पालिका आयुक्त म्हणून सेवा बजावली होती.
सध्या महा पालिकेत सभागृह अस्तित्वात असल्याने बेळगाव शहर अनेक नागरी समस्यांच्या विळख्यात आहे पाणी टंचाई,सांडपाणी निवारण तसेच स्मार्ट सिटीच्या कामांची अमल बजावणी अशी अनेक कामे प्रलंबित आहेत त्यामुळे मेघण्णावर हे प्रशासक झाल्याने शहराच्या समस्या सुटतील का?त्यांच्या कडून अपेक्षा करायला काहीच हरकत नाही अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
दलित संघटनेचे मललेश चौगुले गजानन देवरमनी अर्जुन देमट्टी, माललेश कुरंगी आदी सह अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत सत्कार केला.