बेळगाव शहर लवकर स्मार्ट झालं पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी या योजनेतील कामे जलदगतीने पूर्ण करावीत अश्या सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या आहेत. मंगळवारी दुपारी स्मार्टसिटी योजनेंतर्गत बेळगावात सुरु असलेल्या विकासासंदर्भात मंत्री सतीश जारकीहोळी यांनी माहिती जाणून घेतली त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या तीन वर्षां पासून स्मार्ट सिटी योजना बेळगावात सुरू असून याची कामे म्हणावी तेवढ्या जलदगतीने व्हायला तयार नाहीत. जारकीहोळी यांनी शहरातील श्रीनगर रस्त्याचे रुंदीकरण , केपीटीसीएल रस्ता , स्मार्ट बसस्थानक , मंडोळी रस्ता , काँग्रेस रोड सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामकाजाची माहिती घेत सदर कामे त्वरित पूर्ण करा अश्या सूचना केल्या.
पाणी समस्ये बद्दल चर्चा केली शहराला पाणी टंचाई भासत असून राकसकोप जलाशयाचे पाणी 25 जून पर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे हिडकलचे पाणी कमी झाले आहे अशी माहिती के यु डब्लू एस अधिकाऱ्याने दिली त्यावर पाणी टंचाईवर तोडगा काढुया असे देखील ते म्हणाले.कोल्हापूर सर्कल राणी चननममा सर्कल,गोवा वेस सर्कल आणि धर्मवीर संभाजी चौकात देखील काँग्रेस रोडच्या धर्तीवर पांढरे काँक्रेट घातले जाणार आहे यावर देखील बैठकीत चर्चा झाली.
पालिका आयुक्त शशिधर कुरेर , स्मार्ट सिटी अधिकारी हुलकुंद , रमेश न्यामगौडा, तसेच विविध खात्याचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते .