तालुका पंचायत सर्वसाधारण सभेत गैरहजर अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वानुमते घेण्यात आली. मागील अनेक बैठकीला तहसीलदार यांच्यासह अनेक अधिकारी अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.
मागील अनेक बैठकीमध्ये अनेक अधिकारी गैरहजर आहेत. त्यांच्यावर वारंवार तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
तालुका पंचायतीच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. व्यासपीठावर तालुका पंचायतीचे उपाध्यक्ष आनंदी, पद्मजा पाटील उपस्थित होत्या.
तालुका पंचायत मध्ये सदस्यांनाच किंमत देण्यात येत नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अजंडा प्रमाणे कार्य करा असे सांगण्यात आले.